येथील नवरेनगर परिसरातील ‘साऊथ इंडियन’ शाळेजचळ कचरा कुंडीतील कचऱ्याला आग लागून शाळेची शेड खाक झाली. शाळेतील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधनामुळे विद्यार्थी थोडक्यात बचावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबरनाथ पश्चिमेकडील या ‘साऊथ इंडियन’ शाळेच्या भिंतीलगत मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर मोठय़ा प्रमाणावर कचरा टाकण्यात येतो. बुधवारी दुपारी १२ च्या दरम्यान या कचऱ्याला आग लावण्यात आली होती. या कचऱ्याच्या आगीच्या झळा मोठय़ा असल्याने शेजारील शाळेच्या प्लास्टिकच्या पत्र्याच्या शेडला या झळा बसल्याने या पत्र्यांनीही पेट घेतला. या शेडशेजारीच नर्सरीचा वर्ग भरत असून, या वेळी वर्गात नर्सरीचे २७ विद्यार्थी होते. आगीची माहिती मिळताच शिक्षक आणि पालकांनी या विद्यार्थ्यांना सुखरूप वर्गाबाहेर काढले. अंबरनाथ अग्निशमन दल आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत शाळेची शेड खाक झाली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at ambernath school shed