कल्याण– कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर फेरिवाल्यांकडून खरेदी केलेली वस्तु खराब असल्याने ती परत करत एका तरुणाने पैसे मागितले. परंतु पैसे देण्यास नकार देत ‘तुम्ही मराठी लोक असेच असतात’ अशी उपरोधिक शब्दात फेरिवाल्याने टिपण्णी केली. यावरून झालेल्या वादानंतर मनसैनिकांनी घटनास्थळी येऊन फेरीवाल्यांना चोप दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> डोंबिवलीत बिगारी कामगाराला खुर्चीला बांधून बेदम मारहाण

रविवारी हा प्रकार कल्याण पूर्वेतील स्कायवॉकवर घडला. यासंदर्भातची एक दृकश्राव्य ध्वनी चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे. मिळालेली माहिती अशी, शहापूर तालुक्यातील वासिंद भागात राहणारा एक मराठी तरूण कामानिमित्त कल्याणमध्ये आला होता. काम आटोपल्यानंतर तो कल्याण रेल्वे स्थानकातून आसनगाव लोकलने घरी जाणार होता.  कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर एका फेरीवाल्याकडून तरुणाने एक वस्तू पैसे देऊन खरेदी केली. ती वस्तू खराब वाटली म्हणून तरुणाने ती परत करुन फेरीवाल्याकडून पैसे परत मागितले. फेरीवाल्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी तरुणाने वस्तू खराब आहे म्हणून ती परत केली. तू माझे पैसे परत कर, असा तगादा लावला.

हेही वाचा >>> डोंबिवली लोकलमध्ये डोंबिवलीकरांना जागा मिळेना

या परप्रांतीय फेरीवाल्याने या तरुणाला उद्देशून ‘मराठी लोक असेच असतात,’ अशी उपरोधिक शब्दात टिपण्णी केली. तरुणाने फेरीवाल्यांना तुम्ही मराठीचा उल्लेख येथे कशासाठी करता. तु मला बोल, असे सांगितले. यावेळी इतर परप्रांतीय फेरीवाले या तरुणाभोवती जमा होऊन हुल्लडबाजी करू लागले. इतर फेरीवाले तरुणाशी वाद घालू लागले. तरुणाने मी मनसैनिकांना बोलवतो, असा इशारा दिला. त्यावेळी तु कोणालाही बोलव जा. ते आमचे काही करणार नाहीत, असा उलट इशारा फेरीवाल्याने दिला. तरुणाने कल्याण पूर्वेतील मनसे शाखेत जाऊन घडला प्रकार तेथे उपस्थित मनसैनिकांना सांगितला. शाखेतील चार ते पाच मनसैनिक तात्काळ रेल्वे स्थानकात आले. त्यांनी हुज्जत घालणाऱ्या फेरीवाल्यांना बेदम चोप दिला. या घटनेनंतर स्कायवॉकवरील इतर फेरीवाले तेथून पळून गेले. काही वेळाने तेथे रेल्वे सुरक्षा बळाचे जवान आले. मनसैनिकांनी फेरीवाल्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकाराने काही वेळ स्कायवॉकवर तणावाचे वातावरण होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Migrant hawkers on kalyan railway skywalk beaten up by mns workers zws