खरे अमिताभ बच्चन कोण सांगा? हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल! | amitabh bachchans duplicate shashikant pedwal touches feet for blessings video viral prp 93 | Loksatta

खरे अमिताभ बच्चन कोण सांगा? हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल!

हा व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून बिग बींचे चाहते पुरते गोंधळून गेले आहेत.

खरे अमिताभ बच्चन कोण सांगा? हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल!
(Photo: Instagram/ shashikant_pedwal)

Amitabh Bachchan Duplicate: बॉलिवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन त्यांच्या वेगळ्या स्टाईल आणि पर्सनॅलिटीसाठी ओळखले जातात. बिग बींनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी आपली हटके स्टाईल दाखवली आहे. अमिताभ बच्चन यांची ही स्टाइल त्यांच्या चाहत्यांना फक्त आवडत नाही तर फॉलोही करत असतात. त्यांचा आवाज.. त्यांची स्टाईल…आणि त्यांचा अंदाज पाहून कोणीही अगदी डोळे झाकून ओळखू शकतं. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून बिग बींचे चाहते पुरते गोंधळून गेले आहेत. खरे अमिताभ बच्चन नक्की कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन उभे आहेत. तितक्यात समोरून आणखी एक अमिताभ बच्चन येताना दिसतात आणि उभ्या असलेल्या अमिताभ बच्चन यांचे पाया पडताना दिसतात. हे दृश्य पाहून सुरूवातीला काही वेळासाठी लोक गोंधळून जातात. दोन-दोन अमिताभ बच्चन बाजुला बाजुला पाहून यातील खरे अमिताभ बच्चन नक्की कोण? हे ओळखणं लोकांना अवघड होऊ लागलं. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा गोंधळून जाल, हे मात्र नक्की.

आणखी वाचा : मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर तरूणांनी केला गरबा डान्स; आनंद महिंद्रा म्हणाले, “गुजरातमधून माझा विरोध…

या व्हिडीओमध्ये पाया पडणारा व्यक्ती हा अमिताभ बच्चन यांचा ड्यूप्लिकेट आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी तो आला होता. शशिकांत पेडवाल असं त्याचे नाव आहे. व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो काढले. अमिताभ यांनी शशीला आशीर्वाद दिले. या व्हिडीओमध्ये पांढरा कुर्ता-पायजमा घातलेले खरे अमिताभ बच्चन आहेत. त्यांनी डोक्यावर टोपी आणि रत्नजडित कोट घातला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर मास्कही होता.

आणखी वाचा : दुसरीतील विद्यार्थ्यांचा भेळ बनवतानाचा VIDEO VIRAL; तब्बल १० मिलियन व्ह्यूज

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : घराच्या छतावर भूत फिरतंय? VIRAL VIDEO पाहून लोक घाबरले, अखेर सत्य काय?

हा व्हिडीओ shashikant_pedwal यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करू लागले आहेत. लोक हा व्हिडीओ पाहून आश्चर्य होऊ लागले आहेत. एकाने कमेंट करताना लिहिले की, ‘मला माहित नव्हतं की अमिताभ यांना जुळे भाऊ आहे’! अमिताभ बच्चन जसे लोकप्रिय आहेत, तसेच शशिकांतही आहे. अमिताभची नक्कल करत तो इतकी वर्षे जगला आहे. त्यांना अनेक वेळा बोलावण्यात आले. दिसण्यापासून ते बोलण्यापर्यंत, चालण्यापर्यंत आणि अगदी आवाजापर्यंत – हुबेहूब अमिताभ यांच्यासारखे आहेत. एका मुलाखतीत शशी यांनी सांगितले की, मी लहानपणापासून अमिताभ यांचे चित्रपट पाहत आलो आहे. आई-वडिलांपासून लपवून त्यांचे चित्रपट पाहिलेत. पण ‘जंजीर’ने माझे आयुष्य बदलून टाकले, असं देखील ते म्हणाले.

हा व्हिडीओ लोक सोशल मीडियावर शेअर करून खरे अमिताभ बच्चन ओळखून दाखवण्याचं आवाहन करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ६.६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ४६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
CCTV Video: प्राचीन शिवमंदिरात घुसून चोरट्यांनी चोरली सोन्या-चांदीची भांडी; दानपेटीला हात लावताच घडलं अस की….

संबंधित बातम्या

Video: नग्नावस्थेत तब्बल २५०० लोकं पोहोचली एकाच ठिकाणी…कारण ऐकाल तर..
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’
कर्म तैसे फळ! मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल; पाहा Viral Video
Viral Video: महिला बाईकवर असताना भररस्त्यात वृद्धाने हद्दच केली, नेटिझन्स म्हणाले, ‘बुजुर्गोंका इमरान हाशमी’
Video: रेल्वे कर्मचाऱ्याची हात चलाखी…; तिकीट काऊंटरवरील ‘हा’ व्हिडिओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सुरतमध्ये रोड शोवरील दगडफेकीनंतर केजरीवालांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “२७ वर्षे काम केलं…”
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस निरीक्षकासह पतीच सापळ्यात अडकला; औरंगाबाद येथील पथकाची कारवाई
बाईक टॅक्सी ॲपवर १० डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन; पुण्यातील रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे
“हा प्रोपगंडा आणि वल्गर चित्रपट…” IFFI मध्ये मुख्य ज्यूरींनीच साधला ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा
VIDEO: “त्याने आमच्या बहिणीचे ३५ तुकडे केले, आम्ही त्याचे…” आफताबच्या वाहनावर तलवारीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची धमकी