उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. अनंत अंबानीचा साखरपुडा राधिका मर्चंटशी झाला आहे. त्या दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. लवकरच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी त्या अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्यासाठी अतिशय जय्यत तयारी करण्यात आली होती. अगदी राजेशाही थाटात त्या दोघांचा साखरपुडा पार पडला. गेले काही दिवस राधिकाच्या मेहंदीचे फोटोही समोर आले होते.

अनंत आणि राधिका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. राधिका अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमांचा भाग असते. त्या दोघांच्या नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत्या. त्यातच आता दोघांचाही साखरपुडा पार पडला आहे. त्यांचे अनेक फोटोही समोर आले आहे.

राधिका मर्चंट कोण आहे?

राधिका ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ बिरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंटचा जन्म १६ डिसेंबर १९९४ रोजी झाला. ती आता २८ वर्षांची आहे. राधिका गुजराती असून बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर तिने मुंबईतील द कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.

गुरु भावना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने श्री निवा आर्ट्समधून भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं आहे. राधिका मर्चंटने न्यूयॉर्क विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. तिला अभ्यासाची आवड आहे. पदवीनंतर ती भारतात परतली आणि एका रिअल इस्टेट फर्ममध्ये काम करू लागली. मात्र, तिने भरतनाट्यमचं प्रशिक्षण सुरू ठेवलं .

अनंत अंबानी व्यतिरिक्त, राधिकाचे नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा यांच्याशीही छान जमतं. या वर्षाच्या मध्यात अंबानी कुटुंबीयांनी राधिकासाठी ‘अरंगेत्रम’ सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यानंतर राधिका आणि अनंतच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर त्यांचा साखरपुडा पार पडला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani and radhika merchant get engaged at ambani residence antilla in mumbai nrp