Boyfriend Leaked Girlfriend Whatsapp Chat: खरा जोडीदार कसा असावा? म्हणजे ज्याच्यासमोर आपल्याला कशाचीही भीती न बाळगता अगदी इतरांना मूर्खसारखा वाटेल असा प्रश्नही बिनधास्त विचारता यावा असा जोडीदार असायला हवा. सोशल मीडियावर असाच बॉयफ्रेंड लाभलेल्या एका मुलीचे काही व्हाट्सअप चॅट्स व्हायरल होत आहेत. या मुलीच्या नशिबाचा सगळ्या इतर तरुणींना हेवा वाटत असला तरी काहींना मात्र बॉयफ्रेंडची दया येत आहे. इतकंच कशाला तरुणाने स्वतः रडण्याचे ईमोजी टाकून आई माफ कर मी चुकीची मुलगी निवडली असे ट्वीट केले आहे. नेमकं या चॅटमध्ये असं लिहिलंय तरी काय हे पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल फोटोमध्ये आपण पाहू शकता की, एका मुलाच्या गर्लफ्रेंडने त्याला दोन फोटो पाठवले आहेत एका फोटोमध्ये तिच्या हातात जिरे आणि एका फोटोमध्ये बडीशेप आहे. या हुशार गर्लफ्रेंड जिरे व बडीशेपमधील फरक कळत नसल्याने तिने थेट आपल्या बॉयफ्रेंडकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. बॉयफ्रेंडने तिला चॅटमध्ये अगदी शांतपणे व प्रेमाने उत्तर दिलं. पण सुमित नावाच्या एका युजरने रडण्याच्या इमोजीसह कॅप्शन टाकून हे स्क्रिनशॉट पोस्ट केले आहेत.

Viral: गर्लफ्रेंडने पाठवलेले फोटो पाहून तरुण झाला इमोशनल!

दरम्यान ही पोस्ट आतपर्यंत ७४ हजाराहून अधिकांनी पाहिली आहे. पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणाने पुन्हा कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा ही मुलगी माझ्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करणार नाही याचा मला विश्वास आहे असेही म्हटले आहे. बहुतांश नेटकऱ्यांनी ही पोस्ट हसण्यावारी घेतली तर काहींनी मात्र एवढं काय, किती वेळा तुम्हाला पण कोथिंबीर पुदिन्याच्या फरक कळत नाही त्याचं काय? अशा कमेंट केल्या आहेत.

हे ही वाचा<< “सेक्स खूप सुंदर पण जे लांब राहतील…” पोप फ्रान्सिस यांनी हस्तमैथुनाचा संदर्भ देत केलेली ‘ती’ विधाने चर्चेत

काही मुलींनी सुद्धा तरुणाची बाजू घेत मुलगा असो किंवा मुलगी निदान एवढं तर माहित असायलाच हवं अशीही कमेंट केली आहे. तुम्हाला अशा कोणत्या पदार्थांमध्ये कन्फ्युज व्हायला होतं का? असं असेल तर तुम्ही काय ट्रिक करता हे नक्की कळवा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boyfriend leaks girlfriend photos in tweet asking difference between jira and saunf says mummy sorry why getting viral svs