भलेही आज बाजारात शेकडो कंपन्यांचे फोन असतील, पण या फोनमध्ये आयफोनची बातच काही और आहे, नाही का? कॉलिंग किंवा मेसेजिंगसाठी आयफोनचा वापर करण्यापेक्षा ‘स्टेटस सिम्बल’ म्हणून या फोनकडे जास्त पाहिलं जातं. तेव्हा भलेही आयफोन आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या खिशाला परवडणारा नसला तरी आपल्याकडे किमान मिरवायला का असेना पण अॅपलाचा फोन हवाच असं आपल्याला वाटलं तर काही गैर नाही. पण या फोनची किंमतच एवढी आहे, की कधी कधी आपल्यालाही प्रश्न पडतो नेमकं या फोनमध्ये असं काय आहे की जे आपल्या फोनमध्ये नाही? आता तुम्हालाही याचं उत्तर शोधायचं असेल तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही जाहिरात पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : अॅपलकडून ‘या’ नव्या प्रॉडक्ट्सची घोषणा; बाजारात घडवणार क्रांती

‘Advertising Today’ या फेसबुक पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘Your phone Vs. iPhone’ या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये तुमचा फोन आणि आयफोन यात नेमका काय फरक आहे हे दोन मिनिटांत समजावून सांगितलं आहे. ‘faster’, ‘smoother’ आणि ‘secure’ ही सामान्य फोनमध्ये तुलनेने कमी असणारी फिचर्स ही अॅपलीची जमेची बाजू आहेत, आणि तेच यात दाखवलं आहे. पण त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या फोनमध्ये शोधूनही सापडणार नाहीत, तेव्हा त्या गोष्टी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. आतापर्यंत ८ लाख ४४ हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर १४ हजारांहूनही अधिक लोकांनी तो शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brilliant advertisement showing difference between iphone and other smart phone