Viral Video: भारतीय नागरिकांमध्ये दररोज स्कूटर, बाईक, चारचाकी अशा वाहनांनी प्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत. या प्रवाशांमध्ये रहदारीच्या नियमांबाबत जागरूकता असणेही तितकेच महत्त्वाचे असते. कारण वाहनचालकांच्या एखाद्या चुकीमुळे अनेक रस्ते अपघातदेखील होत असतात. वाहतुकीचे नियम तोडल्याने स्वतःचे तर नुकसान होतेच, पण आपल्यामुळे इतरांचाही जीव धोक्यात येतो. तर या पार्श्वभूमीवर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये वाहनचालकाच्या धडकेमुळे एक उंट अगदीच वाईट परिस्थितीत गाडीत अडकला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातील आहे.भरधाव कारने टक्कर दिल्यामुळे उंट कारच्या विंड स्क्रीनमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्हिडीओमध्ये उंट कळवळताना दिसत आहे. कारण त्या वाहनातून तो काही केल्या बाहेर पडू शकत नाही आहे. ही घटना घडली तेव्हा उंटाचा कळवळतानाचा आवाज ऐकून तेथील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तुम्हालाही उंटाची बाहेर पडण्याची धडपड पाहून नक्कीच वाईट वाटेल. नक्की काय घडलं एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा पाहा.

हेही वाचा…VIDEO: पाणीपुरीवर परदेशी नागरिक फिदा ! मोफत पाणीपुरीचा घेतला असा आस्वाद की… VIDEO जिंकेल तुमचं मन

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, पांढऱ्या रंगाच्या कारचे इंडिकेटर लाइट चालू आहे. उंटाचा कळवळतानाचा आवाज येत असतो. कारण कारने धडक दिल्यामुळे कारच्या विंड स्क्रीनमध्ये उंट अडकला आहे, त्यामुळे परिसरात नागरिकांची गर्दी दिसते आहे. उंटाला बाहेर कसं काढावं असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला दिसत आहे. कारण उंट अशा पद्धतीत गाडीत अडकला आहे की, त्याची वेदना ऐकून वा पाहून तुमच्याही डोळ्यात चटकन पाणी येईल. तसेच उंटाला सुखरूप बाहेर काढले की नाही याची अद्याप माहिती नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सचिन गुप्ता या युजरच्या @SachinGuptaUP एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘राजस्थान हनुमानगड जिल्ह्यात उंट आणि कारचा अपघात, गाडीच्या विंडस्क्रीनमध्ये अडकून उंट जखमी आणि कारमधील प्रवासी सुरक्षित आहेत’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. सोशल मीडियावर ही घटना प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओवर “ही घटना खूप दुःखद आहे, माणूस आपली वेदना व्यक्त करू शकतो, पण गरीब प्राण्याचं काय?” अशी कमेंट एका युजरने केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Camel got stuck windscreen of car after high speed collision the animal grunting as it could not maneuver out of the vehicle asp