Cats Video Viral On Instagram: सोशल मीडियावर भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. बातम्यांमध्ये सुद्धा खून, दरोडे, अत्याचार, बलात्कार या घटनांचं प्रमाण खूप असतं पण कधीतरी एखादी अशी घटना डोळ्यासमोर येते की ज्याने अजूनही माणसात माणुसकी जिवंत आहे यावर विश्वास ठेवता येतो. एका चिमुकल्या जीवाला वाचवण्यासाठी दोन खऱ्या आयुष्यातील शूरवीरांनी घेतलेली मेहनत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. एरवी आपण जाळ्यात अडकणं हा शब्दप्रयोग ऐकला की काहीतरी चुकीचंच घडणार, कुठेतरी नुकसानच होणार असा विचार करू लागतो पण जाळ्यात अडकल्याने एखाद्याचा जीव वाचू शकतो हे तुम्ही आज पहिल्यांदाच पाहणार आहात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

@giedde या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये समुद्राच्या किनाऱ्याला जोडून असणाऱ्या लहानश्या पुलावर एक मांजरीचं पिल्लू अडकल्याचे दिसत आहे. पावसामुळे खवळलेल्या समुद्राच्या लाटा या पुलाला येऊन आदळताना दिसत आहेत. अशात गांगरून गेलेलं मांजरीचं पिल्लू त्या पुलावर एकटंच अडकलं आहे. किनाऱ्याजवळ अनेकांची गर्दी त्याला बाहेर कसं पडता येईल यासाठी हातवारे करून समजवताना दिसतेय पण यातील दोन जण जीवाची बाजी लावून जाळं घेऊन तिथे पोहोचतात. सुरुवातीला मांजरीच्या पिल्लाला त्यांच्यावर विश्वास नसतो त्यामुळे ते पिल्लू सुद्धा उलट पळायला सुरुवात करतं. अखेरीस इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती असताना पिल्लू माणसांवर विश्वास ठेवतं, आणि ते दोघे सुद्धा त्याला जाळ्यातून अलगद उचलून बाहेर घेऊन येतात.

Video: मृत्यूच्या दाढेत अडकला चिमुकला जीव…

हे ही वाचा<< कंत्राटदाराने जमीन हिसकावली, तर पोलिसांनी मालकिणीचे केस खेचून गावात…स्पष्टीकरण ऐकून होईल संताप

दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून या दोन्ही शूरवीरांचे कौतुक केले आहे. माणुसकीवर विश्वास ठेवायला भाग पाडणारे हे दृश्य आहे असेही काहींनी म्हटले आहे. आजच्या दिवसातील हा सर्वात सुंदर व्हिडीओ आहे, तुम्हालाही असं वाटतं का, कमेंट करून सांगा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cats video viral on instagram trapped in death scene of angry sea brave man goes with net saves life being human svs