खाद्यपदार्थंचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. खाद्यपदार्थांचे काही व्हिडीओ पाहून तोंडाला पाणी सुटते तर काही व्हिडीओ पाहून किळस येते. कारण अनेक व्हिडीओमध्ये खाद्यपदार्थांमध्ये उंदीर, झुरळ, पाल आढळ्याचे दिसले आहे. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीच्या कॅन्टीनमधील आहे. व्हिडीओमध्ये एका समोस्यात मेलेल्या मुंग्या आढळ्याचे दिसते आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

du_india या इंस्टाग्राम हँडलद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओची सुरुवात एका व्यक्तीने समोसा कडक आवरण काढून आतील बटाट्यावर मेलेल्या मुंग्या असल्याचे दिसते आहे. कॅमेरा दुसऱ्या व्यक्तीच्या प्लेटकडे वळतो आणिदुसऱ्या समोस्यामध्येही मेलेल्या मुंग्या दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “दयाल सिंग कॉलेजच्या समोस्यात मुंग्या सापडत आहेत. मी आणि माझ्या मित्राने ते दयाल सिंग कॉलेजच्या कॅन्टीनमधून हे विकत घेतले आणि जेवणात मुंग्या सापडल्या. हे पोस्ट करा जेणेकरून प्रत्येकाला हे माहित असावे आणि कॅन्टीनमधून खाद्यपदार्थ खरेदी करू नका. ”

हेही वाचा – भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच

व्हायरल व्हिडिओ येथे पहा:

हा व्हिडिओ ७ एप्रिल रोजी शेअर करण्यात आला आणि प्लॅटफॉर्मवर असंख्य प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना, एका उपाहासात्मक टिका केली,, “कारणे देणे थांबवा, फक्त ते (अतिरिक्त प्रथिने) खा.” दुसऱ्याने लिहिले, “ते मुंग्यांनाही किती गोंडस आहार देतात! दिल्ली युनिव्हर्सिटीचे चांगले काम कौतुकास्पद आहे की कोणीतरी त्या गरीब मुंग्यांबद्दल विचार केला पाहिजे.

हेही वाचा – शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली १० हजार किलोंची मिसळ; अजित पवार अन् चंद्रकांत पाटलांनीही मारला ताव, पाहा Video

“कँटीनवाले दादा व्हेज पॅटी वरून नॉन व्हेज पॅटी असे नाव बदलत आहे,” असे तिसऱ्याने विनोद केला. “बाहेर कुरकुरीत, आत कुरकुरीत,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी, ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. ज्यामध्ये एक कामगार मोठ्या कंटेनरमध्ये पायांनी बटाटे स्मॅश करताना दिसत आहे.