Viral Video : इंटरनेटच्या जगात दररोज नवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये एक कंटेन्ट क्रिएटर त्याचा गुजराती मित्र कॅनडामध्ये वीजेची बचत करण्यासाठी वापरत असलेले जुगाड दाखवत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोक यावर भरभरून कमेंट्स करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओच्या सुरुवातीलाच कॉन्टेन्ट क्रिएटर तरूण म्हणतो की, “कॅनडा देश महागडा आहे पण आम्ही गुजराती आहोत. जग इकडचं तिकडे होऊदे पण बजेट होऊ देणार नाही”.

या व्हिडीओमध्ये तो सांगतो की, कशा प्रकारे त्याचा दुसरा एक गुजराती मित्र कॅनडामध्ये वि‍जेचे बील जास्त येण्याबद्दल सांगतो आणि नंतर तो मित्र या कॉन्टेन्ट क्रिएटरला चहा करण्यासाठी फ्रीजमधून दूध आणायला सांगतो. पण जेव्हा तो दूध घेण्यासाठी फ्रीज उघडतो तेव्हा ते रिकामं असतं. त्यानंतर त्याचा मित्र त्याला दुसरा दरवाजा उघडण्यास सांगतो, हा दरवाजा घरातील बाल्कनीत उघडतो आणि त्याला दिसून येतं की फ्रीजमधील सर्व वस्तू ठेवण्यासाठी त्याचा मित्र बाल्कनीचा वापर करतोय. येथे फ्रीजमध्ये असायला हव्यात अशा सगळ्या वस्तू आणि खाद्यपदार्थ बाल्कनीमधील उणे १५ सेल्सियस तपमानात ठेवण्यात आले आहेत.

हे पाहून कॉन्टेन्ट क्रिएटर आश्चर्य व्यक्त करतो, तसेच हे फक्त एक गुजराती माणूसच करू शकतो हे देखील यावेळी सांगतो. “भाई, प्रत्येक गुजराती हा इलॉन मस्क आहे”, अशा शब्दात तो गुजराती मित्राने वि‍जेच्या बिलावर खर्च होणारे पैसे वाचवण्यासाठी वापरलेल्या जुगाडची स्तुती करतो. या व्हिडीओला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. इंस्टाग्रामवर या व्हिडीओला पाच लाखांहून जास्त व्हिव्यूज मिळाले आहेत. तसेच कमेंटमध्ये देखील लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Every gujarati is elon musk gujarati man desi jugaad to cut high electricity bills in canada goes viral rak