ICC Champions Trophy 2017 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यापासून पाकिस्तानी संघ जरा जास्तच फॉर्मात आहे. अशातच पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमल सध्या भारीच चर्चेत आलाय. चर्चेत यायचं कारण तसं मजेशीर आहे म्हणा. महिला गोलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवर उमर क्लीन बोल्ड झालायं, तेव्हा त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या उमर अकमल नॉर्वेमध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद लुटतोय. तिथल्या काही पाकिस्तानी नागरिकांनी एका चॅरिटी क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं होतं. त्या क्रिकेट सामन्यात उमर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. दोन महिला संघांमध्ये क्रिकेटचा सामना सुरू होता. सामना सुरू असताना उमरलाही मैदानात उतरण्याचा मोह आवरता आला नाही. आपण काय सहज या मुलींच्या वरचढ ठरू असं उमरला वाटलं की काय कोण जाणे अन् तो मैदानात उतरला पण बॅट हातात घेतल्यावर पुढच्या काही सेकंदात इस्मा अहमदने उमरची विकेट घेतली. पहिल्याच चेंडूवर क्लिन बोल्ड झाल्याने त्याचा आत्मविश्वास पार धुळीस मिळाला असेल. तेव्हा उमरचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. एका महिलेकडून तेही पहिल्याच फटक्यात क्लिन बोल्ड होण्याचं दु:ख त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं तेव्हा उमरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय.

वाचा : मिताली राजचं कौतुक करताना कोहलीची ‘विराट’ चूक

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hilarious video of umar akmal bowled by a female leg spinner in norway