केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार सध्या ज्यांच्याकडे आधार कार्ड असेल त्यांनी आयकर भरताना ते सादर करणे सक्तीचे असणार आहे. तसेच १ जुलैपासून नव्या पॅनकार्डसाठीही आधार कार्डाची गरज असणार आहे. तेव्हा १ जुलैच्या आधी पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करणं गरजेचं असणार आहे.
आता ते लिंक कसे करावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१. ज्यांनी आयकर विभागाच्या साईटवर आधीच नोंदणी केली आहे त्या युजर्सने सर्वप्रथम ‘‘link adhaar’ वर क्लिक करावं. अशा प्रकारे ते पॅन आणि आधार लिंक करू शकतात. पण त्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड गरजेचा आहे.
https://incometaxindiaefiling.gov.in/ या लिंकवर क्लिक केल्यास डाव्या हाताला वरच्या बाजूला तुम्हाला ‘link adhaar’ चा पर्याय दिसेल.
२. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल. ज्यावर तुम्हाला पॅन, आधारकार्ड नंबर, आधार कार्डवरील तुमचं नाव अशी दिलेली माहिती भरावी लागेल.
ही माहिती भरताना तुम्हाला ‘ i have only year of birth in adhaar card’ चा पर्याय दिसेल. जर तुम्ही आधारकार्डवर फक्त जन्मवर्षच भरलं असेल तर या पर्यायावर टिक करा.
३. ही माहिती भरल्यानंतर खाली कॅप्चा कोड दिलेला असेल तो व्यवस्थित बघून जसाच्या तसा भरा.
४. ही माहिती पूर्णपणे भरून झाल्यानंतर खाली ‘link adhaar’ चा पर्याय दिलेला असेल त्यावर क्लिक करा जेणेकरून तुमचं आधार- पॅन लिंक होऊ जाईल.