सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे लोकांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तर या उन्हाच्या भीतीमुळे अनेकजण दिवसा घरातून बाहेर पडणं टाळत आहेत. तसेच दुपारच्या वेळी प्रवास करताना लोकांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोक घरातून बाहेर पडताना उन्हापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे उपाय करताना दिसत आहेत. यासाठी कोणी टोपी घालून तर कोणी गॉगल घालून घराबाहेर पडत आहे. मात्र कडक उन्हात प्रवाशांना गारवा मिळावा यासाठी सध्या एका रिक्षा चालकाने अनोखा जुगाड केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर आपणाला दररोज नवनवीन जुगाडाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही जुगाड खरोखर कौतुकास्पद असतात. जे पाहिल्यानंतर अनेक नेटकरी या जुगाडांचा अवलंब करण्याचाही प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये उन्हाचा त्रास कमी व्हावा यासाठी रिक्षाच्या मागे कुलर बसवल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- खेळता खेळता वॉशिंग मशीनमध्ये जाऊन बसला लहान मुलगा….भयानक व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

रिक्षालाच लावला कूलर –

उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एका चालकाने वाहनांच्या छतावर गवताच्या पेंड्या ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच आता असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रिक्षा चालकाने चक्क रिक्षात कूलर बसवल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. रिक्षा चालकाच्या जुगाडाचा व्हिडओ kabir_setia नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रिक्षाच्या मागे कूलर बसवल्याचं दिसत आहे. त्यामुळे या रिक्षातून प्रवास करताना चालकासह प्रवाशांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा- ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल…’ गाणं ऐकताच संतापला माजी सैनिक, सफाई कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला अन्…

प्रवाशांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून रिक्षा चालकाने केलेल्या भन्नाट जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय तो व्हिडीओ अनेकांना आवडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत हा व्हिडीओ २ लाख १६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर २ मिलियनहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “इतकं श्रीमंत व्हायचं आहे.” दुसर्‍याने लिहिलं “खूप छान, प्रत्येकजण स्वत:साठी कूलर लावतो, पण या भाऊंनी जनतेचाही विचार केला आहे.” तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘मी चुकीच्या रिक्षा चालकाला पैसे देत आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jugad of driver to protect passengers from sun video of putting cooler directly on rickshaw goes viral jap