viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ अत्यंत प्रेरणा देणारे असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक गोष्टी शिकायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या काही तरुण मुलामुलींसमोर भाषण देताना दिसत आहे. भाषणादरम्यान ती मुलांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा, असा लाखमोलाचा सल्ला देताना दिसते तसेच ती तरुणांना म्हणते की घडणं आणि बिघडणं हे आपल्या हातात आहे.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणी भाषणादरम्यान म्हणते, “सोनं करतो की माती करतो, हे आपल्या हातात असते. आता कोणाच्या घरची परिस्थिती नाही आहे तुम्हाला शिकवण्याची तरी तुम्हाला येथे पाठवलं. त्याचं तुम्हाला सोनं करायचं की माती हे तुमच्या हातात आहे. ते त्यांचं कर्तव्य पार पाडताय. ते तुम्हाला पैसे देताहेत. ते तुम्ही मागा, तुमच्या पप्पाजवळ पैसे नसू द्या पण ते म्हणतील तुला किती पाहिजे ते सांग. म्हणताहेत की नाही मग आपण कुठे कमी पडतोय, याचा पण विचार करा. आपले आईवडिल कुठेच कमी पडत नाही, पडतो तर आपण कमी पडतोय. त्यामुळे आपण तशी मेहनत करायला पाहिजे. ठीक आहे, हे वय असतं बिघडायचं पण हेच वय असतं घडायचं त्यामुळे बिघडायचं की घडायचं हे आपल्या हातात असतं.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

sangharsh_academy_sambhajinagr या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “घडणं आणि बिघडणं हे आपल्या हातात आहे म्हणून यंदा जितकी टाकत आहे तितकी लावायची” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ताई तू लाखात खरं बोलली” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान अनुभवाचे आणि मार्गदर्शन लाभेल असे शब्द” आणखी एका युजरने लिहिलेय, “जिद्द करायला शिका, जे नशिबात नाही, त्या गोष्टीला सुद्धा मिळवायला शिका.” एक युजर लिहितो, “शेवटची लाइन मनाला लागली हेच वय असत बिघडायचं आणि हेच वय असत घडायचं” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life motivational video a young girl tells the importance of life and what should do in life viral video ndj