करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढल्यानंतर केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. या काळात सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झालेल्या असल्यामुळे सर्व खेळाडू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या आपल्या रांचीतल्या फार्महाउसवर क्वारंटाइन झालेला आहे. धोनीची पत्नी साक्षीने काही दिवसांपूर्वी आपल्या रांचीतल्या फार्महाउसचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य पाहा – ७ एकराच्या जागेवर उभं आहे धोनीचं रांचीमधलं अलिशान फार्महाऊस…

मात्र या लॉकडाउनच्या काळात धोनीची मुलगी झिवाला कंटाळा आला, मग काय बाबांनी लगेच आपली बाईक काढत झिवाला फार्महाउसची सफर घडवली. साक्षी धोनीने इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत हे चित्र धोनीच्या सर्व चाहत्यांना दाखवलं.

२०१९ विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर धोनीला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. आयपीएलद्वारे धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर खेळणार होता. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धोनीला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं होतं. पण सध्या करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता धोनीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन हे कठीण दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni takes ziva for a spin inside his farmhouse psd