पाणीपुरी म्हटलं की, अगदी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि महिला वर्गाचा तर हा अगदी आवडता खाद्यपदार्थ आहे. लहान मुली, तरुणी, स्त्रिया अगदी कधीही, कुठेही पाणीपुरी खाण्यासाठी तयार असतात. तर आज सोशल मीडियावर पाणीपुरी संबंधित एक पोस्ट व्हायरल होत आहे. नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी पाणीपुरी खाताना एक फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. तर आज पुन्हा एकदा त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात ते पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसून आले आहेत. पाणीपुरी विकणाऱ्याने पाणीपुरीसाठी लागणारं सामान हातगाडीवर ठेवलं आहे. तसेच तेमजेन इम्ना अलॉन्ग पाणीपुरीच्या हातगाडीच्या अगदी बाजूला उभे आहेत आणि छोटासा बाऊल हातात धरून पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत. नागालँडचे मंत्री यांनी पाणीपुरीचा कसा आनंद घेतला एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघाच…

हेही वाचा… ”लग्नासाठी मुलगी पाहिजे पण आई…” ढोलवादकाने हटके स्टाइलमध्ये घातली लग्नाची मागणी, अट एकच; VIDEO तुफान व्हायरल

पोस्ट नक्की बघा :

नागालँडचे मंत्री पाणीपुरीचा आनंद घेताना :

भारतात सर्व वयोगटातील लोकांना स्ट्रीट फूड खायला आवडते. त्यातचं पाणीपुरी अनेकांची पहिली पसंती आहे. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांत पाणीपुरी विविध नावाने ओळखली जाते. तर आज नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनीसुद्धा आपल्या पोस्टद्वारे स्ट्रीट फूडवर असणारं त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे आणि या खास क्षणाचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांचा पाणीपुरी खाण्याचा बाऊल बघून तुम्हालादेखील हसू आवरणार नाही. तर नागालँडचे मंत्री पाणीपुरी खातानाचा फोटो पोस्ट करून नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यात पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहेत.

नागालँडचे मंत्री यांनी त्यांच्या अधिकृत @AlongImna या (एक्स) ट्विटर अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘तुम्ही काहीही म्हणा, आपला स्टार स्ट्रीट फूड आहे’ ; असे कॅप्शन देण्यात आले आहे. पोस्ट बघून पाणीपुरी खाण्याची प्लेट खूपच मोठी आहे, अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली आहे. तसेच ‘या बाबतीत महिलांचा रेकॉर्ड तुम्ही तोडू शकत नाही’ असेसुद्धा काहीजण म्हणताना दिसत आहेत. तसेच एक पाणीपुरीची प्लेट कितीला? असे अनेकजण मजेशीर प्रश्न आणि कमेंट फोटोखाली करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagaland minister temjen imna along enjoyed panipuri asp