१० दिवसांचा गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात आणि आनंदात पार पडला. मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ढोल ताशांच्या गजरात गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली. सोशल मीडियावर ढोल-ताशा वादनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान एका ढोल वादकाच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्वच ढोल वादक उत्तम वादन करतात मग या तरुणाने असे काय विशेष केले ज्यामुळे तो चर्चेत आला आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल? होय ना. चला तर मग जाणून घेऊ या

व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुण उत्साहात जल्लोषात ढोलवादन करताना दिसत आहे. त्यांच्या उत्तम ढोलवादनामुळे नव्हे तर एका तरुणाच्या ढोलवर लावलेल्या सुचनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा – तरुणीने चक्क विणेवर सादर केली ‘आमच्या पप्पांनी आणला गणपती’ गाण्याची धून, तिचे गोंडस हास्य अन् मोहक हावभाव एकदा पाहाच

व्हिडीओमध्ये एका तरुणाने आपल्या ढोलवर चक्क लग्नासाठी मुलगी पाहिजे असे पोस्टल चिटकवले आहे. एवढंच नाही तर त्याने स्वत:चा फ्लॅट आहे आणि पगार ४५ हजार आहे असे लिहिले आहे. तरुणाने त्या खालोखाल एक महत्त्वाची सुचना देखील लिहिली आहे ज्यामुळे सर्वजण त्याचे कौतूक करत आहे. ”आई वडिलांना सोडून राहणार नाही अशी सुचनाही त्याने लिहिली आहे.

हेही वाचा – ताई, तुला मानाचा मुजरा”, एका हातानेच ढोल वादन करणाऱ्या तरुणीचा प्रेरणादायी व्हिडीओ व्हायरल, लोकांनी तिच्या जिद्दीचे केले कौतूक

लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. दरम्यान अनेकांनी व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत आहे. एका तरुणीने कमेंट केली की ”कधी पाठवू दादाला मागणी घालायला.” एकाने कमेंट केली की, ”मुलगी आई-वडीलांना सोडून येते ते बरं चालतं.” आणखी एकाने लिहिले की ”शेवटचे वाक्य एकदम कडक”

Story img Loader