पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारतीय अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधांबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सोनालीसोबत अफेअरच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही असं शोएबने स्पष्ट केलं आहे. ‘अनेक माध्यमांनी मी सोनालीचं अपहरण करण्याच्या तयारीत होतो अशाही बातम्या चालवल्या, त्या देखील कोणत्या आधारावर चालवल्या हे कळत नाही’, असं म्हणत शोएबने माध्यमांवर देखील टीका केली. याशिवाय त्याने अभिनेत्री दिया मिर्झा हिच्यासोबत त्याचं नाव देखील विनाकारण जोडण्यात आल्याचं सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युट्यूबवरील एका व्हिडिओद्वारे शोएबने पहिल्यांदाच सोनाली आणि दिया मिर्झा यांच्याशी असलेल्या कथित रिलेशनशिपबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. काही वर्षांपूर्वी शोएब अख्तर आणि सोनाली बेंद्रेबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. शोएबला सोनाली इतकी आवडते की तो तिचं अपहरण करण्यास देखील तयार आहे, अशीही जोरदार चर्चा होती. अनेक माध्यमांनी याबाबत त्यावेळी वृत्त दिलं होतं. यावरुन माध्यमांवर टीका करताना शोएबने यातील कोणत्याच गोष्टीत तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच, ‘मी आजपर्यंत सोनालीला कधीही भेटलेलो नाही. ती खूप सूंदर आहे पण मी तिचा चाहता कधीच नव्हतो. मी तिचे केवळ एक किंवा दोन चित्रपट पाहिले आहेत. पण, जेव्हा कर्करोगावर तिने यशस्वी मात दिल्याचं समजलं आणि त्यावेळची तिची हिंमत पाहिल्यानंतर मी तिचा चाहता झालो’, असं शोएबने सांगितलं. तसंच शोएबच्या पाकिटात नेहमी सोनालीचा फोटो असतो आणि त्याच्या रुममध्ये सोनालीचे खूप पोस्टर्स लागले आहेत अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यावर बोलताना शोएबने, ‘माझ्या रुममध्ये कधीही सोनालीचं पोस्टर नव्हतं, माझ्या रुममध्ये केवळ आणि केवळ इम्रान खान यांचंच पोस्टर होतं आणि तेच माझे हिरो होते’. असं म्हटलं. याशिवाय दिया मिर्झा हिच्याशी देखील माझं नाव विनाकारण जोडण्यात आल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

पाहा व्हिडिओ –

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak cricketer shoaib akhtar breaks the silence on affair with actress sonali bendre sas