पनीर लबाबदार ही चविष्ट भाजी तुम्ही अनेकवेळा खाल्ली असेल. सध्या या भाजीचे नाव इंटरनेटवर व्हायरल होत आहे. याचे कारण म्हणजे एका हॉटेलमधील मेन्यु कार्डमध्ये पनीर लबाबदारच्या जागी चक्क पनीर लॅब्राडोर लिहिण्यात आले आहे. लॅब्राडोर ही कुत्र्याची एक जात आहे, त्यामुळे पनीर लॅब्राडोर असे भाजीचे नाव वाचताच कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑटोकरेक्टमुळे असा गोंधळ झाल्याची शक्यता या पोस्टच्या कमेंटमध्ये वर्तवण्यात आली आहे. ऑटोकरेक्ट वापरताना वेगळाच अर्थ निघणारा शब्द टाईप होतो, याचा अनुभव तुम्हीहो बऱ्याचदा घेतला असेल. असेच काहीसे याबाबतीत झाले. या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहा व्हायरल होणारा फोटो आणि त्यावरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

आणखी वाचा: Video: स्कूटर पार्क करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

फोटो:

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

आणखी वाचा: या चित्रात असलेली चुक तुम्हाला ओळखता आली का? १० सेकंदात ओळखण्याचे चॅलेंज स्विकारा

नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या असून, हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paneer labrador instead of paneer lababdar printed on hotel menu card is now viral see what netizens have to say about it pns