जमिनीवरून होणारे हे भांडण काही वेळेस खुप गंभीर वळण घेते आणि गोष्ट पार हाणामारी पर्यंत जाते. खासकरून महाराष्ट्रात याचं प्रमाण खूपच जास्त आहे. कधी कधी हा वाद इतका टोकाला जातो की एखाद्याचा जीवही जातो. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. इंचभर जागेवरून देखील हे वाद होतानाचे चित्र ग्रामीण भागात आहे. शेजारी तर सोडा पण सख्ख्या भावा भावात हे बांधावरून वाद झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात आहेत. असाच भावाभावांमधील वाद आता चव्हाट्यावर आलाय, कारणं एकानं भावासोबतच्या जमिनीच्या वादाला कंटाळून चक्क बॅनर जागोजागी लावले आहेत. हे बॅनर पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सख्खा भाऊ पक्का वैरी!

या बॅनरवर तुम्ही पाहू शकता, “सख्खा भाऊ पक्का वैरी! भावाला वैतागुन वावर विकणे आहे” असा आशय लिहला आहे. हे संपूर्ण प्रकरण शेवगाव तालुक्याताल आहे. एका वैतागलेल्या भावाने नामी युक्ती केली आहे. त्याने चक्क आपली जमीनच विकायला काढली असून तसे फलक शेतात लावले आहे. शेवगाव तालुक्यात जायवाडी धरण परिसरातील या भावाचा हा फलक सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. या भावाने आपल्या शेतात लावलेला हा फलक व्हायरल झाला. त्यावर त्याचा क्रमांकही आहे. तेव्हा राज्यभरातून अनेकांनी त्याला फोन केले. त्यावरून मिळालेली माहिती अशी की त्याची या परिसरात पाच एक जमीन आहे. मात्र त्याचा भावाशी वाद आहे. त्याच्या त्रासामुळे जमीन कसणे अवघड झाल्याने त्याने ती विकायलाच काढली. त्यासाठी असा फलक लावला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – भारतीय विद्यार्थ्याने मद्यधुंद महिलेवर केला बलात्कार, घटनेचा CCTV VIDEO व्हायरल

त्याला आता दूरदूरवरून फोन येऊ लागल्याने फोन बंद करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. हे पोस्टर जुनं असून पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two brothers fighting for farm brother selling farm in unic way poster viral on social media srk