Viral Video: सोशल मीडिया ॲप्सवर रिल फिचर लाॅंच झालायं तेव्हापासून रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. यातले काही व्हिडिओ सगळ्यांना पोट धरून हसवतात तर काही व्हिडिओ नकळत अनेक गोष्टी शिकवून जातात.तसेच नेटकर्‍यांना स्क्रोल करताना एखादा व्हिडिओ आवडला तर तो व्हिडिओ नेटकरी अनेकांना शेअर करतात आणि हे व्हिडिओ घराघरात जाऊन पोहोचतात. तर असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ ज्यातून एक श्वान (pug Dog) म्हणजेच अम्मू आहे प्रेक्षकांच्या घरोघरी व मनोमनी पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही व्हायरल व्हिडीओमध्ये बघू शकता अम्मू घराच्या दारात कशाची तर वाट पाहत बसली आहे. काही वेळाने व्हिडीओ जसा पुढे जातो अम्मूच्या दाराशी एक केळी भरून ट्र्क येतो आणि रोजच्या ग्राहकाला म्हणजेच अम्मूला केळी विक्रेता केळं देऊन‌ जातो.

अम्मू आणि केळी विक्रेत्याचं‌ नातं कसं?

अम्मू या केळी विक्रेत्याला तिच्या लहानपणापासून ओळखते.आणि ती दररोज बरोबर ठरविक वेळी केळी विक्रेत्याची वाट बघत असते.आणि केळी विक्रेता सुद्धा अम्मूला प्रेमाने रोज एक केळं देऊन जातो.

The pawsome life of ammu (द पावसम लाईफ ऑफ अम्मू )या युजरवर हा सुंदर व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे.अम्मू आणि तिचं केळ्यावरील प्रेम असं या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओला साडे सात लाखाहून अधिक व्ह्यूज व लाईक्स आहेत.तसेच हा व्हिडिओ ३२६४ लोकांनी शेअर केला आहे.नेटकर्‍यांना व्हिडिओ आवडला असून त्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.

व्हिडिओ पहा

हेही वाचा :- शाहरुख खानच्या फिटनेसची आनंद महिंद्रांना पडली भुरळ, व्हिडीओ पाहून म्हणाले, ‘जिंदा बंदा’…५७ वर्षांचा हिरो?

तुम्ही प्राण्यांवर जितकं प्रेम करालं त्यापेक्षा जास्त ते तुमच्यावर करतील. प्राण्यांमध्ये माणसांपेक्षा जास्त प्रेम असतं,आणि त्यांना सुद्धा आपल्यासारखी प्रेमाची गरज असते. आणि ते आपण वेळोवेळी त्यांना द्यायला हवं,हे आज या व्हायरल व्हिडिओ मधून पुन्हा एकदा सिद्ध‌ झालयं‌.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of pug dog waiting for banana seller goes viral people say we humans fight without reason learning from animals asp99