Emotional Reunion Video : मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अनमोल नाते आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळी मैत्री अनुभवता येते पण त्यापैकी काही ठराविक लोकांबरोबरची मैत्री आयुष्यभर टिकते. या नात्यामध्ये प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी दिसून येते. नेहमी साथ देणारी, कधीही एकटं सोडणारी आणि चुकले तर समजावून सांगणारी मैत्री मिळायला भाग्य लागतं. सोशल मीडियावर मित्र मैत्रीणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ भावुक करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या जिवलग मैत्रीणीला तब्बल पाच वर्षानंतर भेटते. त्यांची पाच वर्षानंतरची ही भेट कशी असते, हे तुम्हाला या व्हिडीओ मध्ये दिसून येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी मैत्रीणीला भेटायला तिच्या घरी जाते. ती तिच्या मैत्रीणीला सरप्राइज देते. ती भेटण्यासाठी खूप उत्सुक दिसून येते. जेव्हा ती पायऱ्या चढून पहिल्या माळावर जाते तेव्हा अचानक तिला पाहून तिची मैत्रीण भावुक होते आणि घट्ट मिठी मारते आणि ओक्साबोक्शी रडताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या जुन्या मित्र मैत्रीणीची आठवण येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “पाच वर्षानंतर माझ्या जिवलग मैत्रीणीला भेटायला न सांगता गेली. बाकी काहीच नको फक्त आयुष्यभरासाठी तुझी मैत्री हवी”
पाहा व्हायरल व्हिडीओ
pratiksha_phapale_3653 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खूप प्रेम सायली. तुझी माझी मैत्री कशी झाली कळलच नाही पण तू माझी आणि मी तुझी जीव की प्राण झाले . शाळेतील एक एक दिवस बरोबर घालवला. किती मज्जा मस्ती केली , १५ वर्षाच्या मैत्रीत तू कधीच भांडली सुद्धा नाही पण मी तुला त्रास द्यायचं कधीच सोडल नाही. तरीही कधी माझ्यावर चिडली नाही रागावली नाही. असंच निखळ प्रेम आपल्यात कायम असुदे. माझ्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची मैत्रीण तू आहेस”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मैत्री काय असते हे जिवंत उदाहरण आहे, डोळ्यातून पाणी आलं खरोखर” तर एका युजरने लिहिलेय, “खूप कमी लोक राहिलेत अशी आता” आणखी एका युजरने लिहिलेय, “घट्ट मारलेली मिठीच खूप काही सांगून जाते” एक युजर लिहिते, “मैत्री ज्यात निस्वार्थ प्रेम आपुलकी असते” तर एक युजर लिहितो, “मनाची खरी ओळख पटली की भावनांचे धागे आपोआप एकमेकात गुंतत जातात ते एवढे प्रभावी असतात की त्यामुळे रक्ताची नाती सुद्धा फिकी पडतात” अनेक युजर्सनी त्यांच्या मैत्रीविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd