आपण सोशल मीडियावर नेहमीच वन्य प्राण्यांच्या आश्चर्यकारक गोष्टींचे व्हिडीओ पाहतच असतो. साप देखील त्यांच्या कृत्याने आपल्याला आश्चर्यचकित करण्यात मागे नाहीत. असाच एक सापांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे व्हिडीओमध्ये?

झोहोचे सीईओ श्रीधर वेंबू यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन पिवळे साप पावसात नाचताना दिसतात. हा व्हिडीओ तामिळनाडूतील तेनकासी येथे शूट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वेंबू यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “आज टेंकासी येथे मुसळधार पावसात दिसलेला अप्रतिम स्नेक डान्स. @AksUnik चे आभार ज्याने फिरायला जाताना फोनवर हे शूट केले.”

( हे ही वाचा: पत्नी म्हणते ‘दाढी काढा नाही तर घटस्फोट देईल’, नवऱ्याची पोलिसांकडे धाव )

आठवड्याच्या सुरुवातीला, आणखी एका सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात काळ्या कोब्रा ग्लासमधून पाणी पीत होता. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने ग्लास धरला होता, तर कोब्रा त्यातून पाणी पीत होता.

( हे ही वाचा: लग्नपत्रिकेत Marriage Act आणि संविधानाची कलमं लिहली; वकिलाची पत्रिका झाली व्हायरल! )

जुलैमध्ये, आणखी एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये एक पाळीव मांजर किंग कोब्रापासून एका कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी सुमारे ३० मिनिटे पहारा देत होती.भारत हे सापांच्या ३५० पेक्षा जास्त प्रजातींचे निवासस्थान असल्याचे मानले जाते आणि त्यातील बहुतांश बिनविषारी आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral two snakes dance in the rain in tamil nadu video shared by zohos ceo ttg