Viral Video: सोशल मीडियावर सातत्याने विविध विषयांवरील व्हिडीओ तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळतात. ज्यात नवनवीन चित्रपटांमधील चर्चेत असलेली गाणी, डान्स स्टेप्स, डायलॉग यांवर अनेक जण रील्स बनवताना दिसतात. सध्या सगळीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘छावा’ चित्रपट खूप चर्चेत असून यामध्ये बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. नुकताच १४ फेब्रुवारी रोजी (काल) हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. शिवाय हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण भावूक झाले, ज्याचे विविध व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, आता चित्रपटगृहातील एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात काही तरुण चित्रपट पाहिल्यानंतर शिव गर्जना म्हणताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ‘छावा’ चित्रपट संपल्यानंतर एक शिवप्रेमी चित्रपटगृहामध्ये पुढे येतो आणि मोठ्या आवाजात शिवगर्जना म्हणायला सुरुवात करतो. यावेळी संपूर्ण चित्रपटगृहातील लोक शिवगर्जनेसाठी उभे राहतात आणि आपल्या छातीवर हात ठेवतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओवर, “क्षणात अंगावर काटा येऊन अभिमान आणि अश्रू दोन्ही डोळ्यात उभे राहिले, छावा चित्रपट पाहून” असं लिहिलं आहे. दरम्यान, यापूर्वी चित्रपटगृहातील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यात हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण भावूक झाल्याचे दिसले होते.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @impacctcrew_satara या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास आठ लाखांहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक नेटकरीही यावर अनेक कमेंट्स करीत आहेत. एकानं लिहिलंय, “छत्रपती संभाजी महाराजांची या नवीन पिढीला नव्याने ओळख करून दिल्याबद्दल मनापासून आभार विक्की कौशल.” दुसऱ्यानं लिहिलंय, “भाऊ रात्रीची १० ची वेळ अंगावर काटा आला…. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “हा सिनेमा पाहून झाल्यावर प्रत्येक थिएटरमध्ये ही शिवगर्जना झालीच पाहिजे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video after watching chhava movie shivpremi said shiv garjana in theater sap