चोरीच्या अनेक घटना जगभर पाहायला मिळतात. अशाच एका मजेदार चोरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. स्नॅचिंगच्या घटनेशी संबंधित या व्हिडीओमध्ये बाईकवरून आलेले दोघेजण दुसऱ्याची बाईक पळवून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. बाईक हिसकावण्यासाठी चोरटे त्यांना बंदूकीचा धाकही दाखवतात. काही वेळासाठी भीतीदायक वातावरण निर्माण होतं. पुढे काय होतंय हे जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच पुढच्या काही मिनिटांत संपूर्ण चित्र पालटून जातं. पुढे जे घडतं ते पाहून तुम्ही सुद्धा थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बाईकवरून दोघे जण दुसऱ्या बाईकस्वाराच्या दिशेने येत असल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या बाईकस्वाराच्या थोडं पुढे येऊन यातल्या एकाने हातात बंदुक पकडलेली दिसून येत आहे. दुसऱ्या बाईकवर बसलेल्या दोघांना हे चोरटे बंदूकीचा धाक दाखवतात. बंदुक पाहून बाईक बसलेले दोघेजण घाबरून जातात. चोरटे या दोघांना बाईक सोडून मागे जाण्यासाठी सांगतात. बंदुक पाहून बाईकवर बसलेले दोघे घाबरून बाईक सोडतात आणि मागे पळून जातात. हे सारं चित्र पाहून मनात धडकी भरू लागते. आता हे चोरटे त्यांची बाईक पळून नेणार असं काही मिनिटांसाठी वाटत असताना अचानक संपूर्ण चित्रच बदलून जातं. पूढ जे घडतं पाहून तुम्ही थक्क व्हाल.

आणखी वाचा : असा अनोखा अपघात तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाहा हा VIRAL VIDEO

चोरटे त्यांची बाईक पळवून नेण्यासाठी बाईकजवळ जातात, तितक्यात घाबरून दूर गेलेल्या दोघांमधील एक व्यक्ती त्याच्या खिशातून बंदूक काढतो. त्या व्यक्तीच्या सुद्धा हातात बंदूक आहे हे पाहून चोरट्यांच्या पायाखालची जमिनच सरकते आणि तिथून ते पळून जातात. अशा प्रकारे त्या व्यक्तीने आपली बाईक चोरी होण्यापासून वाचवली.

आणखी वाचा : पत्नीला बसमध्ये जागा मिळवून देण्यासाठी केला भन्नाट जुगाड, मग काय घडलं, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कासवाची शिकार करण्यासाठी एक, दोन नव्हे तर चक्क तीन सिंहांनी केला प्रयत्न, पण…

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. यूजर्स इमोजीच्या माध्यमातून लोक त्या व्यक्तीच्या शौर्याला सलाम करत आहेत. त्या व्यक्तीने दाखवलेले शौर्य खरोखरच पाहण्यासारखं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of robbers came to snatch the bike by showing a gun see what happened next omg news prp