Viral Video: समाज माध्यमांवर सातत्याने विविध वयोगटांतील, विविध देशांतील, विविध भाषांचे अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ युजर्सना इतके आवडतात की, ज्यामुळे ते खूपच चर्चेत येतात. हल्लीच्या अनेक लहान मुलांमध्येही सोशल मीडियाप्रति खूप आकर्षण आहे. नवनवीन गाणी, चित्रपट आणि त्यातील डायलॉग्ज मुलांना तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवितात. काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘आग साजने माझ्या बाया भुकल्यान गं’, हे गाणं खूप चर्चेत आहे. आता या गाण्यावर एका चिमुकलीनं जबरदस्त डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका चिमुकलीने तिच्या घरामध्ये नऊ वारी साडी नेसून, हिरव्या बांगड्या, दागिने, असा मराठमोळा साजशृंगार केला आहे. ती ‘आग साजने माझ्या बाया भुकल्यान गं’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही खूप कमालीचे आहेत, जे पाहून नेटकरीही तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vedanti_the_dramebaaz या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय दुसऱ्या युजरने लिहिलेय, “वेदांती एकच नंबर.” आणखी एकाने लिहिलेय, “पिल्लू खूप छान डान्स करते” आणखी एकाने लिहिलेय, “एक्स्प्रेशन द्यायला शिकली.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video small girl tremendous dance on marathi song users appreciate watching the video sap