International Women’s Day : विस्तारा एअरलाईन्स कंपनीने प्रवाशांसाठी बुधवारी नव्या योजनेची घोषणा केली आहे. आठ मार्च रोजी असणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विस्तारा एअर लाईन्सने विमानामध्ये महिलांना मोफत सॅनिटरी पॅड देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विस्तारा एअरलाईन्सने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. सध्या देशांतर्गत विमानप्रवासात महिलांसाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. असा निर्णय घेणारी विस्ताराही देशातील पहिली एअरलाईन्स ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विस्तारा एअरलाईन्समध्ये पुरवण्यात येणारे पॅड्स हे ISO 9001:2015 सर्टिफाईड बायो डिग्रेडेबल आणि ऑर्गेनिक असतील. हे नॅपकिन्स प्लॉन्ट बेस फायबर पासून बनवलेले असून ते प्लॉस्टिक, टॉक्सिन्स आणि परफ्युम विरहीत असतील. ८ मार्चपासून विमानातील सर्व क्रू मेंबर्स सॅनिटरी पॅड्सबद्दल माहिती देतील. गरजेनुसार तुम्ही अगदी मोकळेपणाने विमानप्रवासात सॅनिटरी पॅडची मागणी करु शकता असे ट्विटमध्ये म्हटले आहे. कंपनीने ट्विट करत #PadsOnBoard हा हॅशटॅग वापरुन या नव्या सुविधेची माहिती दिली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vistara to provide sanitary napkins on request on all its flights from this womens day