आरामदायक आणि सोईस्कर प्रवास व्हावा म्हणून अनेक जण ऑनलाइन कॅब बुक करून प्रवास करणे पसंत करतात. पण, अनेकदा हे कॅब ड्रायव्हर प्रवाशांना फसवतात किंवा चुकीच्या पत्त्यावर घेऊन जातात. तर कधी कधी सुट्टे पैसे जवळ नसल्यामुळे ड्रायव्हर आणि प्रवाशांमध्ये वाद होतो. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक महिला प्रवासासाठी कॅब बुक करते. तसेच पाच रुपये जास्तीचे मागितले म्हणून कॅब ड्रायव्हर आणि महिलेचा जोरदार वाद होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला प्रवासासाठी कॅब बुक करते. कॅब बुक केल्यावर तिथे प्रवासादरम्यान तुम्हाला किती रुपये द्यावे लागणार हे तिथे स्पष्ट नमूद केलेले असते आणि ॲपवर दिसणारे पैसे तुम्हाला प्रवास संपल्यावर ड्रायव्हरला द्यावे लागतात. तर व्हिडीओतील महिला जेव्हा कॅब बुक करते, तेव्हा तिला ९५ रुपये दाखवतात. जेव्हा प्रवास पूर्ण होतो तेव्हा मात्र कॅब ड्रायव्हर महिलेला चुकीच्या पत्यावर घेऊन जातो आणि तिच्याकडे १०० रुपयांची मागणी करतो; हे ऐकून महिला त्याला पाच रुपये देण्यास नकार देते आणि दोघांमध्ये वाद सुरू होतो.

हेही वाचा…१९६३ला एका लिटर पेट्रोलची किंमत किती होती?व्हायरल बिल पाहून नेटकऱ्यांना आठवले ‘अच्छे दिन’

व्हिडीओ नक्की बघा :

जेव्हा महिला आणि कॅब ड्रायव्हरमध्ये वाद सुरू होतो, तेव्हा महिला तिचा मोबाइल घेऊन हा प्रसंग रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करते. हे जेव्हा कॅब ड्रायव्हरला कळते, तेव्हा तो आणखीन चिडतो आणि जोरजोरात भांडायला सुरुवात करतो. या दरम्यान महिलासुद्धा ड्रायव्हरशी मोठ्या आवाजात वाद घालत असते, हे सगळं पाहता ड्रायव्हर भांडण मिटवण्यासाठी महिलेला तिच्या लोकेशनवर पोहचवणार असे सांगतो. पण, यासाठी पाच रुपये जास्त घेणार अशी मागणी करतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @vlog या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेक युजर त्यांच्याबरोबर घडलेला प्रसंग कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत. तसेच कॅब ड्रायव्हर लोकेशन माहीत असेल तरीही मुद्दाम प्रवाशांना फसवतात आणि जास्तीचे पैसे घेतात; अशासुद्धा अनेक कमेंट नेटकरी करताना दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman fight with cab driver for demanding five more rupees asp