Twitter Widget

वक्ता दशसहस्त्रेषु

राजकारण, समाजकारण ढवळून काढणाऱ्या, कला-नाटय़-वाङ्मय क्षेत्रात चौफेर फटकेबाजी करणाऱ्या, नवविचारांची बीजे रोवणाऱ्या ओजस्वी वक्त्यांची दैदीप्यमान परंपरा महाराष्ट्राला आहे. कालौघात ही परंपरा नाममात्र उरल्यासारखी झाली. त्याच तेजस्वी परंपरेचे, वक्तृत्वाच्या कलेचे पुनरुज्जीवन व्हावे या हेतूने ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष. गेल्या वर्षीच्या स्पर्धेला राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-वक्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाच, परंतु जाणकार श्रोत्यांनीही त्याला भरभरून दाद दिली. त्या प्रतिसादांची, अनुभवांची शिदोरी घेऊनच या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला येत्या १८ जानेवारीपासून सुरुवात करण्यात येत आहे. राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतून महाराष्ट्राचा ‘वक्ता दशसहस्रेषु’ निवडला जाणार आहे. ‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल’ सहप्रायोजक असलेली ही राज्यस्तरीय स्पर्धा १८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नागपूर आणि रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडेल. या विभागीय प्राथमिक फेरीनंतर, विभागीय अंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करून पुढे येणारा प्रत्येक केंद्रातील एकेक विद्यार्थी असे आठ विद्यार्थी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत सहभागी होतील.
‘सिंहगड इन्स्टिटय़ूट्स’, ‘मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस’ आणि ‘इंडियन ऑइल’ पॉवर्ड बाय ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ स्पर्धेसाठी ‘युनिक अकॅडमी’, ‘स्टडी सर्क ल’ हे नॉलेज पार्टनर आहेत.