भाईंदर : मीरा- भाईंदर महानगरपालिकेचा २०२३- २४ या आर्थिक वर्षांसाठी प्रशासकीय अर्थसंकल्प पालिका आयुक्त दिलीप ढोले यांना सादर करण्यात आला. २ हजार १७४ कोटी जमा आणि खर्च २५ लाख शिलकीचा हा अर्थसंकल्प असून यंदा कुठलीही करवाढ करण्यात आलेली नाही. मागील आर्थिक वर्षांत पालिकेने १ हजार ८१७ कोटी रुपये जमा व खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात आता १९.४८ टक्के वाढ झाली आहे. तर यंदाचा अर्थसंकल्प शैक्षिक, आरोग्य आणि  पर्यावरण घटकाला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला असल्याचा दावा पालिकेने केला आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीरा भाईंदर महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे पहिल्यांदाच प्रशासकीय राजवटीत  महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. सोमवारी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मणोरकर यांनी आयुक्त आणि प्रशासक दिलीप ढोले यांना हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी उपायुक्त संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त मारुती गायकवाड, शहर अभियंता दीपक खांबित, सुरेश वाकोडे, मुख्य लेखाधिकारी का.रा.जाधव आणि अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते. करोनाकाळानंतर आर्थिक घडी सावरत असल्याने नागरिकांवर कसल्याही प्रकरची करवाढ लादली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे विविध योजना आणि प्रकल्प राबविणार असून उत्पन्नाचे नवीन मार्ग विकसित करण्यात आले आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mbmc chief present 2000 crore budget of mira bhayander municipal corporation zws
First published on: 14-03-2023 at 02:54 IST