वसई : अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिझान खान याच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली. शिझान याने  तुनीषासोबत झालेल्या संभाषण मोबाईलमधून  नष्ट का केले याचा तपास करण्यासाठी  पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात वालीव पोलिसांनी तुनिशाचा माजी प्रियकर शिझान खान याला अटक केली आहे. बुधवारी त्याची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपली. दुपारी त्याला वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला ३० डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी दिली. शिझान आणि तूनिशा यांच्यामध्ये ‘व्हाट्सअप’वर नेमके काय संभाषण होते?  याबाबत तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tunisha sharma suicide case increase in shizan khan police custody ysh