वसई : चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला असताना वसईत काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. सावत्र आईने ७ आणि ८ वर्षांच्या चिमुकल्यांना अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. तिने मुलांच्या गुप्तांगानाही गरम चाकूने चटके दिले आहेत. याप्रकरणी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसईत राहणार्‍या नागनाथ सावरगळी (३२) यांचा पहिली पत्नी चिन्नमा सोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर नागनाथ यांनी २०२३ मध्ये नेहा सावसगळी (२७) हिच्यासोबत दुसरे लग्न केले. नागनाथ यांना पहिल्या पत्नीसपासून ७ वर्षांचा अंकुश आणि ८ वर्षांचा आयुश अशी दोन मुले आहेत. नागनाथ यांचा कुरियरचा व्यवसाय असून नेहा गृहीणी आहे. कामानिमित्त नागनाथ बाहेर असायचे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना मुलांच्या वागण्यात बदल जाणवला. मुले अबोल आणि घाबरलेली दिसू लागली. विचारणा केली तेव्हा मुले काही बोलत नव्हती. नागनाथ यांना मुलांच्या शरिरावर जखमा दिसल्याने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. मग मुलांनी सावत्र आई मारत असल्याचे सांगितले. त्यांच्या गुप्तांगाला गरम चाकूचे चटके दिले. लाटण्याने त्यांना अमानुष मारहाण केली. यानंतर नागनाथ यांनी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वालीव पोलिसांनी या प्रकरणी नेहा सावगरळी विरोधात कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ तसेच अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ त्या कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा…वसई : नव्या सर्वेक्षणात उमेळेवासियाना दिलासा, रेल्वे भूसंपादनात खासगी जागेला वगळले

मुलांना चटके दिल्याची घटना जून मध्ये घडली आहे. परंतु काल मुलांच्या पित्याने तक्रार दिल्यानंतर आम्ही आम्ही गुन्हा दाखल केला असून या याप्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांनी दिली. मुलांची प्रकृती आता ठिक असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…वसई : नव्या सर्वेक्षणात उमेळेवासियाना दिलासा, रेल्वे भूसंपादनात खासगी जागेला वगळले

माझ्या मुलांना ती खूप दिवसांपासून मारहाण करत होती. मात्र तिने मुलांना धाकात ठेवल्याने ते काही बोलत नव्हती. ती माझ्यामुलांकडून घरातील कामे करवून घेत होती, असे मुलांचे पिता नागनाथ सावरगळी यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai stepmother brutally assaults children case filed psg