२) भूजलाची पातळी जमिनीच्या पृष्ठभागापासून किती खोल आहे आणि ऋतुमानानुसार त्यात किती वाढ किंवा घट होते, हेही माहीत असायला हवं. कारण पाण्यामुळे माती ओली झाली की तिची वजन पेलण्याची क्षमता कमी होते.
३) त्याबरोबरच इमारतीच्या पायामध्ये वापरल्या जाणाऱ्या काँक्रीटसाठी भूजलातले काही रासायनिक घटक हे धोकादायक ठरू शकतात. यामध्ये सल्फेट आणि क्लोराइडसारखे क्षार असतात. अशा घटकांनी जर काँक्रीटवर हल्ला केला, तर काँक्रीटचे तुकडे पडू शकतात किंवा काँक्रीटमधल्या सळ्या गंजू शकतात. तसं झालं आणि जर इमारतीचं वजन पेलण्याची पायाची ताकदच गेली, तर भविष्यात इमारत कोसळायचा धोकाही उद्भवू शकतो. म्हणूनच भूजलाची रासायनिक तपासणी करून त्यात असणाऱ्या या धोकादायक घटकांचं प्रमाण जाणून घेणं गरजेचं असतं.
४) जमिनीखाली असणाऱ्या मातीच्या किंवा खडकाच्या प्रत्येक थराची घनता जेवढी जास्त, तेवढी त्यांची वजन पेलण्याची क्षमता जास्त असते. ही घनता आपण परीक्षणातून जाणून घेऊ शकतो.
५) या माती किंवा दगडाच्या थरांवर वजन आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचे थर त्या वजनामुळे कमी-अधिक प्रमाणात दबले जाऊ शकतात. त्यामुळे न खचता ही माती किती वजन पेलू शकेल, ते आपल्याला तपासणीतून मिळालेल्या माहितीवरून समजू शकतं.
६) काही प्रमाणात इमारतीच्या पायाखालची माती खचली तरी ते प्रमाण अत्यल्प असेल, तर त्यामुळे फारसा फरक पडत नाही. हे अत्यल्प म्हणजे किती, ते भारतीय मानकांमध्ये दिलेलं असतं. त्यामुळे विशिष्ट प्रकारच्या मातीमध्ये पायाभरणी केल्यानंतर त्या प्रकारचा पाया हा नेमून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक तर खचत नाही ना, हेही तपासावं लागतं. त्यासाठीही मातीचं परीक्षण करणं गरजेचं असतं.
अशा प्रकारे आपण स्वत: घर बांधणार असाल, तर इमारतीच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी अधिकृत जिओटेक्निकल इंजिनीअरचा अहवाल घ्यायला विसरू नका. आपल्या विकासकाकडे त्यासाठी आग्रह धरा. मात्र विकतचे घर घेणार असाल तर विकासकाने अशा प्रकारची तपासणी केली आहे का, याची विचारणा करू शकता.
मनोज अणावकर – vasturang@expessindia.com
(सिव्हिल इंजिनीअर)
संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2015 रोजी प्रकाशित
घरकुल अपुले छान : माती इमारतीचे नाते
‘वेल बिगन इज हाफ डन,’ अशी एक म्हण इंग्रजीमध्ये आहे. म्हणजेच, कुठल्याही कामाची सुरुवात चांगली झाली, तर ते काम निम्मं पार पडलंच म्हणून समजा. आणि ते खरंच आहे. कारण नमनालाच समस्यांची...

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-07-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soil and building relationship