[ie_dailymotion id=x7g1gub] दिवाळीची धामधूम सुरु असताना मंगळवारी रात्री मुंबईतील वरळी येथील मॅरेथॉन इमारतीतील ८,९,१० मजल्याना आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या ८ गाड्या, तर ६ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझनण्यासाठी अग्नीशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉक सर्किटमुळे आग लागल्याची प्रथमिक माहिती मिळत आहे. या आगीत आतापर्यंत कोणत्याही जिवीत हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.