[ie_dailymotion id=x7g1eu9] नाशिकच्या तांबट गल्लीतील श्री कालिका देवी मंदिरात काल मध्यरात्री चोरी झाली. दोन चोरट्यांनी मोठ्या कटरने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कड्या कापून आत प्रवेश केला. चोरांनी अंदाजे चार ते पाच लाखांचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज चोरून नेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. अंदाजे चार ते पाच लाख रुपये किमतीचे सोने चोरीला गेल्याची माहिती विश्वस्त प्रसन्न तांबट यांनी दिली.