वसईतील भाताने गावातील चित्रकार कौशिक जाधव याने टोमॅटो, कांदा, गाजर, वांगी, फ्लॉवर, आलं, बटाटा, भोपळी मिरची यांसारख्या भाज्यांवर वॉटर कलरचा वापर करून अष्टविनायकांचे चित्र रेखाटले आहे. फळभाज्यांवर चित्र रेखाटण्याचा हा त्याच्या पहिलाच प्रयत्न होता. त्याच्या या कलाकृतींचे सगळीकडूनच कौतुक केले जात आहे.