Jar Tar Chya Goshti, Ganeshotsav Special Benefits Of Modak: लोकसत्ता विशेष सीरीज जर तरच्या गोष्टीमध्ये आपलं स्वागत; गणपती बाप्पा विशेष आठवड्यात आपण एकदम तुम्हा आम्हा सगळ्यांच्या अगदी बाप्पाच्याही आवडीचा विषय घेणार आहोत, विषय आहे मोदक, जास्वंद, दुर्वा! या सगळ्यांचे आरोग्यदायी फायदे! आता तुम्ही म्हणाल बाप्पाला प्रिय असला तरी मोदक म्हणजे कॅलरी बॉम्ब, मग तो खाल्ल्याने आपला फायदा कसा होईल? किंवा जास्वंद आणि दुर्वा फायद्याचे हे माहित्येय पण त्याचा आहारात उपयोग कसा करायचा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत.