Uddhav Thackeray and Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील विविध शहरांत नेते आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कामाचा आढावा घेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील बैठकांचा धडाका लावला आहे. यातच आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चाचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे हे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत.