आयपीएल २०२३च्या अंतिम फेरीत गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला. अतिशय रंजक अशा या सामन्यात अखेर चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. पावसाने सामन्यात व्यत्यय आणला मात्र, एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएल चषकावर आपलं नाव कोरलं आहे. यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
 
   
   
   
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 






 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  