[ie_dailymotion id=x7g1edw] लोकसत्ता लाईव्ह चॅटमध्ये यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हजेरी लावली होती. 'गेला उडत' या नाटकाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील हे प्रसिद्ध आणि नावाजलेले चेहरे यावेळी लोकसत्ताच्या एफबी लाइव्ह चॅटसाठी आले होते. यावेळी सिद्धार्थ आणि केदार शिंदे यांची लोकप्रियता पाहता नेटिझन्सनीही मोठ्या उत्साहात या दोघांवरही प्रश्नांची बरसात केली. या लाइव्ह चॅटदरम्यान सिद्धार्थ जाधव आणि केदार शिंदे यांनी चाहत्यांच्या प्रश्नांना अगदी दिलखुलासपणे उत्तरं देत मनमोकळा संवाद साधला.