दिग्दर्शक महेश कोठारे आणि दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे या दोघांकडे कायम जोडगोळी म्हणून पाहिलं जायचं. असंख्य सुपरहिट चित्रपट देणारी ही जोडी आजही प्रेक्षकांची लाडकी आहे. विशेष म्हणजे केवळ १ रुपया मानधन घेत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महेश कोठारेंचा चित्रपट साइन केला होता. त्यावेळच्या जुन्या आठवणींना महेश कोठारेंनी उजाळा दिला आहे.