मराठी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण करणारा दिवंगत अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. अनेक भूमिका अजरामर करणारा हा अभिनेता मैत्रीच्या दुनियेतदेखील बापमाणूस होता असं अनेकदा त्यांच्या कलाकार मित्रांकडून ऐकायला मिळतं. विशेष म्हणजे मैत्रीखातर लक्ष्मीकांत यांनी ‘मैनें प्यार किया’ हा चित्रपटदेखील वेळ पडल्यास सोडला असता असा अविस्मरणीय किस्सा महेश कोठारे यांनी सांगितला आहे.