अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे लवकरच त्यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. याच चित्रपटातील किस्से आणि रंजक गोष्टी त्यांनी ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’मध्ये शेअर केल्या. यावेळेस त्यांनी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान झालेल्या एका अपघाताची माहिती दिली.
 
   
   
   
  

 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 

 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  