एक नाही, दोन नाही, तीन नाही तर चक्क ६ बायकांबरोबर होणारा प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे? याचा उलगडा ‘बाई गं’ चित्रपटातून होणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो. पण, जेव्हा एक नाही चक्क सहा बायका एखाद्या पुरुषाच्या पाठिशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल? हे ‘बाई गं’ या चित्रपटातून आपल्याला कळेल. याच निमित्ताने या चित्रपटातील कलाकारांनी लोकसत्ता डिजिटल अड्डाला उपस्थिती लावत दिलखुलास संवाद साधला.
 
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 










 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  