बिग बॉस मराठीच्या घरात आज पाहुणे म्हणून दोन चिमुकली बाळं येणार आहेत. या बाळांच्या रक्षणाची जबाबदारी घरातील सदस्यांवर दिली आहे. हेच काम करताना वर्षा उसगावकर व निकी तांबोळी मध्ये पुन्हा एकदा खडाजंगी होऊ शकते. वर्षा या निक्कीची कानउघाडणी करताना ऐकू येत आहेत. हिला फक्त लोकांसमोर तांडव नृत्य करता येतं असं म्हणत वर्षा टास्कमध्ये निक्कीला झुंज देतायत यावेळी निखिल दामले, अंकिता वालावलकर आणि पॅडी दादा सुद्धा वर्षा ताईंची पाठराखण करताना दिसत आहेत. या भन्नाट टास्कची एक झलक आपण आता पाहूया, पण संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी कलर्स मराठीच्या चॅनेलला भेट द्या.
 
   
   
   
  

 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 

 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  