आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मुंबईचा लोकप्रिय ‘लालबागचा राजा’ देखील भक्तांना दर्शन देण्यासाठी सज्ज झाला आहे. गणेशोत्सवासाठी शासनाने आखून दिलेल्या निर्बंधांचे पालन करत लालबागचा राजा मंडळात ४ फूट उंच मूर्तीची स्थापना केली जातेय. सर्व नियमांचे पालन करत यंदाही पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जाणार आहे.