गणेशोत्सवानिमित्त गणेशभक्त वेगवेगळे देखावे साकारत आहेत. असाच एक प्रभावी देखावा साकार केला आहे मुंबईमधील जोगेश्वरीच्या बांद्रेकरवाडी मित्रमंडळाने. या मंडळाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी हा देखावा १००० किलो पुठ्ठयांचा वापर करून तयार केला असून हा पूर्णपणे इको फ्रेंडली देखावा आहे.
 
   
   
   
  




 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 











 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  