भारताचे दिग्गज फलंदाज, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अर्जून तेंडूलकरचा साखरपुडा झाल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अर्जुननं बालपणीची मैत्रीण सानिया चंडोक हिच्याशी साखरपुडा केल्याचं म्हटले जातंय. सानिया चंडोक ही उद्योजक रवी घई यांची नात आहे. दरम्यान सोशल मीडियावर याबद्दल बोललं जात असतानाच अर्जूनच्या संपत्तीविषयीही चर्चा सुरू झाली आहे. अर्जून नेमका कमावतो किती? याबद्दल नेटीझन्स व्हायरल होणाऱ्या पोस्टवर विचारताहेत. हीच माहिती व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.



