विविध राज्यांतील सीईटी तोंडावर असतानाच २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासूनच एमबीबीएस-बीडीएस या अभ्यासक्रमांचे सर्व प्रवेश 'नीट' या केंद्रीय प्रेवेश परीक्षेद्वारेच केले जावेत, या न्यायालयाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना हादरा बसला आहे. निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूने लागला नाही तर पालक उपोषण करण्यासही तयार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमका हा सर्व गोंधळ काय आहे, याची माहिती दिली आहे, 'लोकसत्ता'च्या वार्ताहर रेश्मा शिवडेकर यांनी.