राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने खडसावले. एकतर या प्रकरणी माफी मागा नाहीतर बदनामीच्या खटल्याला सामोरे जा, या शब्दांत न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावले.